नवी दिल्ली: सिनेसृष्टीत होत असलेल्या कास्टींग काऊचबाबत जगभरातून आवाज उठत आहे. हा आवाज आता अधीक तीव्र होत असून, सिनेसृष्टीत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात अनेक अभिनेत्रींनी आपली बेधडक मतं मांडली आहेत. दरम्यान, या अभिनेत्रींमध्ये आता रोझमंड पाइकचाही समावेश झाला आहे. रोझमंड हिने जेम्स बॉन्ड सीरिजमधील ‘डाय अनदर डे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, तिच्यावर ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगाबाबत प्रथमच वाच्यता केली.


'मागणी धुडकावल्याचा काहीही परिणाम नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोझमंड पाइक सांगते की, '..तेव्हा ‘डाय अनदर डे’चे चित्रिकरण सुरू होते. अभिनेता होता पिअर्स ब्रॉसनॅन. त्याच्यासोबत मला मिरांडा फ्रॉस्ट हे पात्र साकारण्याची संधी मिळणार होती. पण, त्यासाठी चक्क एक विचित्रच मागणी करण्यात आली. अर्थात ही मागणी आपण फेटाळून लावली. आणि त्याचा आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही', असे रोझमंड सांगते.


काय होती मागणी?


‘अॅमेझॉन्स ऑडिबल सेशन्स’मध्ये बोलताना रोझमंडने हा प्रसंग कथन केला. ती म्हणाली, 'बॉन्ड चित्रपटासाठी मी पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती. आजही तो प्रसंग मला चांगला आठवतोय. त्यांनी मला चक्क विवस्त्र होऊन येण्याची मागणी केली. त्यांचे म्हणने होते की, मी केवळ अंतर्वस्त्रांमध्ये यावं'. दरम्यान, रोझमंडने ही आठवण सांगितली खरी. पण, तिच्याकडे अशी विचित्र मागणी कोणी केली हे मात्र स्पष्ट केले नाही.


'त्यांनी मला इव्हिनिंग ड्रेसमध्ये यायला सांगितले'


पुढे बोलताना रोझमंड सांगते की, 'तेव्हा मी केवळ २१ वर्षांची होते. आणि मला त्या जगाबाबत फारसे काही माहिती नव्हते. त्यांनी मला इव्हिनिंग ड्रेसमध्ये यायला सांगितले. ही मागणी होताच मला काहीच क्षणात कळले की, आपण एका वेगळ्याच दुनियेत आलो आहोत. मी असे करण्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. पण, त्या प्रकारानंतर आपल्याला सेटवर कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही', असेही रोझमंड म्हणाली. दरम्यान, आपण न घाबरता तेव्हा वावरू शकलो याचे श्रेय तीने बार्बला ब्रोकोली यांना दिले आहे.