मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरलाय. 2022 च्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. मात्र या  चित्रपटावर आता विदेशी प्रेक्षकांनी एक अजबचं दावा केला आहे. विदेशी प्रेक्षक हा गे चित्रपट असल्याचा दावा करतायतं. या दाव्यावरून भारतीय प्रेक्षक आणि विदेशी प्रेक्षक चांगलेच भिडलेत. तर भारतीय चित्रपट निर्मात्याने या दाव्याला समर्थन दिल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट भारतासह विदेशातही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि परदेशातही भरपूर कमाई केली. मात्र आता या चित्रपटावरून विदेशी प्रेक्षक एक वेगळाच दावा करत सुटलेत. विदेशी प्रेक्षक राजामौली यांच्या आरआरआर हा गे चित्रपट असल्याचे बोलतायत. आरआरआर चित्रपटातील राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्या केमिस्ट्रीला 'गे' म्हटले आहे. त्यामुळे हा गे चित्रपट असल्याची चर्चा विदेशी प्रेक्षकांमध्ये आहे. 


विदेशी प्रेक्षक काय म्हणाले ? 
एका विदेशी प्रेक्षकाने ट्विटकरत या सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात खुप छान अॅक्शन, साहसी दृष्ये, आणि रिवेंज, पण तुमच्यापैकी कोणीही मला सांगेल का #RRRMovie हा गे चित्रपट आहे ? असे सर्व ट्विट त्याने केले आहे.  



भारतीय दिग्दर्शकाचे 'या' दाव्याला समर्थन 
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'RRR मधील राम चरण आणि ज्युनियर एनटीआरची केमिस्ट्री समलिंगी जोडप्यासारखी आहे. या विदेशी प्रेक्षकांच्या दाव्याशी मी सहमत असल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटलेय.  



भारतीय प्रेक्षकांचे प्रत्युत्तर 
ट्विटवर अनेक भारतीय प्रेक्षकांनी चित्रपटातील रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मैत्रीवरील समलैंगिक टिप्पणीला बकवास म्हटलेय.'विदेशी प्रेक्षक मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत. दोन माणसांच्या मैत्रीवर आधारित चित्रपट त्यांना पचनी पडत नसल्याचे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 



दरम्यान या चित्रपटावरून ट्विटरवर मोठा वाद सूरू झालाय. भारतीय प्रेक्षक आणि विदेशी प्रेक्षक या चित्रपटावरून भिडले आहेत. तर आता  राम गोपाल वर्मा यांनी या दाव्याला समर्थन दिल्याने वाद आणखीण वाढण्याची शक्यता आहे.