मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट मार्च महिन्याच्या अखेरीस रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच सिनेमाची गाणी एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. RRR बद्दलची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. राजामौली यांचा हा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. आता या सिनेमाचं बजेट देखील समोर आलं आहे. 


पण या सिनेमासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम ऐकून अनेकजण एकच वाक्य बोलत आहेत. ते म्हणजे या सिनेमाने 300 कोटींचा व्यवसाय केला तरी हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरेल. 


या सिनेमाने मोठा आकडा पार केला तर सिनेमाच्या टीमला नुकसानच होईल. आता त्याचं कारण एकच आहे. ते म्हणजे या सिनेमासाठी मोठी रक्कम गुंतवण्यात आली आहे.


RRR चे बजेट 336 कोटी असल्याची चर्चा आहे. एका नवीन अहवालानुसार, RRR चे हे बजेट कलाकार आणि क्रूचे वेतन काढून टाकल्यानंतरचे आहे. म्हणजेच दिग्दर्शक राजामौली यांनी त्यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाच्या बजेटपेक्षा 100 कोटी  जास्त गुंतवत हा सिनेमा तयार केला आहे.


आंध्र प्रदेशचे मंत्री पेरनी नानी यांनी सांगितलं की, 'आम्हाला आरआरआरच्या निर्मात्यांकडून एक अर्ज आला आहे. त्या माहितीनुसार, निर्मात्यांनी GST आणि कलाकार आणि क्रूचे पगार काढून चित्रपटावर 336 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


लवकरच ही फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार असून चित्रपटाच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा विचार केला जाईल. सरकारने चित्रपटगृहांना तिकिटावर 75 रुपये अधिक 


आकारण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे.