मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपट १  डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशा या चित्रपटाशी निगडीत विरोधही वाढत आहे.  


काही दिवसांपूर्वी 'पद्मावती' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार्‍या दीपिकाचे नाक कापू अशी धमकी आली होती. मात्र वाढत्या विरोधाला प्रतिकार करत दीपिका प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 


एकीकडे बॉलिवूड 'पद्मावती'  चित्रपटाच्या पाठीशी उभं आहे. तसेच आता हॉलिवूडमधूनही दीपिकाच्या पाठीमागे कलाकार उभे राहत  आहेत. 


‘xXx:द रिटर्न ऑफ झेंडर केज’या दीपिकाच्या चित्रपटातील सहकलाकार रूबी रोजने ट्विटरच्या माध्यमातून दीपिकाचे कौतुक केले आहे. 



 


  इतक्या प्रखर विरोधातही उभी असल्याने तुझ्या साहसाचे कौतुक करायला हवे अशा स्वरूपाचा संदेश तिने दीपिकासाठी लिहला आहे. 


पद्मावती चित्रपटामध्ये शाहीद कपूर, रणवीर सिंग सह  अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटामध्ये ' राणी पद्मावती'चे चुकीचे स्वरूपात  चित्रण करण्यात आले आहे. तसेच इतिहासातील काही संबंध बदलल्याचा म्हणत काही रजपूत संघटनांनी पद्मावतीला तीव्र विरोध दर्शवला आहे.