`मन उडू उडू झालं` अभिनेता ऋतुराज फडकेनं घेतलं हक्काच घर
Ruturaj Phadke and his wife bought new home : `मन उडू उडू झालं` फेम अभिनेता ऋतुराजनं गायकवाडनं घेतलं हक्काच घर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.
Ruturaj Phadke and his wife bought new home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये काहीच आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं' ही मालिका. ही मालिका गेल्यावर्षीच संपली असली तरी देखील सोशल मीडियावर आजही या मालिकेचे काही फॅन पेज काही क्लिप्स शेअर करताना दिसतात. इतकंच नाही तर या मालिकेतील कलाकारांच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. या मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडकेनं अखेर स्वत:चं घर घेतलं आहे. याविषयी सांगत त्याची पत्नी प्रितीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहत्यांनी त्या दोघांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रिती आणि ऋषभनं त्यांच्या हातात घराची चावी पकडली आहे. हा फोटो शेअर करत प्रिती म्हणाली की "स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे 'आपलं स्वतःच हक्काचं घर'. ते कसंही असो, लहान किंवा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. जानेवारी 2023 मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात व्यस्त झालो त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघरला जाऊन व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही. अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि ओटी भरुन आलो. त्यांचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली."
हेही वाचा : प्रियांकाची लेक मालतीनं दिवाळीच्या निमित्तानं काढली रांगोळी, लेकीची कलाकारी पाहून प्रियांकाला झाले आश्चर्य
पहिली दिवाळी नव्या घरात
पुढे प्रिती म्हणाली की, "काही दिवसांपूर्वी, आमचं 'आपलं स्वतःचं घर' हे स्वप्न पूर्ण झालं आणि आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतोय. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव 'योगेश्वरी'. ते म्हणतात ना, 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है'.. हे आम्ही अनुभवलं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असुद्या. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा" प्रिती आणि ऋषभच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यावर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.