मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचं नुकतंच 'साथ क्या निभाओगे' हं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं रिलीज होताचं इंटरनेटवर खूप वेगानं व्हायरल झालं आहे. हे गाणे टोनी कक्करने लिहिले आणि गायलं आहे आणि त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये निधी अग्रवाल सोनू सूदसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. यूट्यूबवर हे गाणं खूप कमी वेळात 15 व्या क्रमांकावर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाणं व्हायरल झालं
काही तासांतच या गाण्याला 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. साहजिकच हे गाणं सुपरहिट झालं आहे. पण आता सोनू सूदला लोकांनी या गाण्यावर रील तयार करावं अशी इच्छा आहे. सोनू सूदने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पोस्ट करत त्याने आपल्या चाहत्यांना रील बनवण्याचं आवाहन केलं आहे. पण सगळ्यात मजेदार म्हणजे सोनूचा हा व्हिडिओ आहे. ज्याद्वारे त्याने चाहत्यांना आवाहन केलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनूने व्हिडिओ शेअर केला आहे
व्हिडिओमध्ये, सोनू सूद निधी अग्रवालसोबत डान्स करताना दिसत आहे. जेव्हा त्याचा एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या डान्सच्यामधे त्रास देतो हे पाहून, सोनू सूदने चाहत्याचं डोकं पकडून त्याला वळवतो आणि त्याला लाथ मारतो. सोनू सूदने हा व्हिडिओ मजेत बनवला आहे आणि खरं तर त्याने त्याच्या कोणत्याही चाहत्यांशी अश्लीलता केली नाही.