मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी आणि एकंदर कलाविश्वात आपल्या कारकिर्दीच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारं एक नाव म्हणजे सचिन पिळगावकर. बहुविध कलाकृती सादर करणाऱ्या याच अभिनेत्याच्या कलेचा वारसा त्यांची मुलगी, श्रिया पिळगावर पुढे नेत आहे. चित्रपट आणि वेब सीरिजच्या विश्वात श्रिया चांगलीच रुळली आहे. किंबहुना फार कमी कालावधीतच तिने स्वत:ची वेगळी ओळखही प्रस्थापित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाऊस अरेस्ट, मिर्झापूर अशा वेब सीरिजमधून प्रभावी भूमिका साकारणारी श्रिया प्रेक्षकांच्या मनात घर करत असतानाच आता तिच्या व्यक्तीमत्वाची भुरळ थेट एका दाक्षिणात्य कलाकारालाही पडली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्याने श्रियाविषयी कौतुकास्पद शब्द लिहिले आहेत. 


मराठमोळ्या श्रियाच्या कामाने प्रभावित झालेला हा अभिनेता म्हणजे 'बाहुबली' फेम 'भल्लालदेव', अर्थात राणा डग्गुबती. मराठी, हिंदी कलाविश्वात अतिशय सराईतपणे वावरणारी श्रिया आता दाक्षिणात्य जगतातही पाभल ठेवल आहे. किंबहुना तिने हे पाऊल ठेवलं आहे. त्याचविषयी राणाने श्रियाचं अतिशय उत्साहात स्वागत केलं आहे. 



श्रिया एक अप्रतिम सहकलाकार असल्याचं सांगत तिच्या सहनशीलतेचीही त्याने प्रशंसा केली आहे. शिवाय बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणाऱ्या 'दाक्षिणात्य चित्रपट' वनिश्वातही त्याने तिचं स्वागत केलं आहे. राणाने ही पोस्ट करतेवेळी 'हाथी मेरे साथी' म्हणजेच 'अरण्य' या आगामी चित्रपटातील तिचा लूकही सर्वांसमोर आणला. 



वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'


वनांवर होणारं अतिक्रमण आणि प्राणीमात्रांच्या जीवनावर होणारे त्याचे थेट परिणाम याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये श्रियाही झळकणार आहे. चित्रपटाचा पोस्टर पाहता त्यामध्ये श्रियाचा लूकही लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे राणा डग्गुबती, पुलकीत सम्राट, झोया हुसैन यांच्यासोबत श्रिया नेमकी कोणत्या भूमीकेत झळकणार याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.