मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. साराची क्यूट स्माईल प्रत्येकाला घायाळ करते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम जिची चर्चा रंगते ती म्हणजे सारा तेंडूलकर. आता पुन्हा सारा नव्या  व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. यावेळी साराच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. या व्हिडीओतून सारा लग्न बंधनात अडकणार असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिची मैत्रिण अलिशासोबत दिसत आहे. यामध्ये ती सांगते की ती तिच्या मित्रापेक्षा जास्त पैसे खर्च करते. शिवाय व्हिडीओमध्ये साराने बेस्ट फ्रेंडआधी लग्न बंधनात अडकणार असल्याचा दावा केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


साराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बेस्ट फ्रेंडसोबत व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, '20 वर्षांची मैत्री... बहिणी...' असं लिहिलं आहे. 


सारा खरंच बॉलिबूडमध्ये येणार का? याबद्दल जाणून घेऊ
ताज्या माहितीनुसार, साराला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे आणि तिला चित्रपटांमध्ये खूप रस आहे. बॉलीवूड लाइफमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले आहे - सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.


साराला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीयशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मात्र, तिला ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करायचे आहे.