मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री सुरवीन चावलाने काही महिने आधीच आपल्या लग्नाची बातमी देऊन सर्वांना धक्का दिला होता. यातून तिचे चाहते सावरत नाहीत तोपर्यंत तिने आणखी एक गोड बातमी दिली आहे. मी प्रेग्नेंट असून पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहतेय असं सुरवीनने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय. आपल्या प्रेग्नेंसीचा खुलासा करणारी पोस्ट तिने शेअर केलीयं. 'आयुष्यात जे घडायचं असतं ते घडतंच' असं ही ती म्हणते. 


सुरवीनचं काम 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरवीन चावला ने आपल्या करिअरची सुरूवात 'कही तो होगा' सिरियल पासून केली. यानंतर ती 'कसोटी जिंदगी की' मध्ये कसकच्या भुमिकेत दिसली.



'कज्जल' मध्ये ती मुख्य भुमिकेत दिसली. 'एक खिलाडी एक हसीना' मध्ये ती खेळाडू श्रीसंथ सोबत होती.



'सोनी टीव्ही'च्या 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार' मध्ये ती सुत्रसंचालन करताना दिसली.


यासोबत ती पंजाबी गाण्यांमध्ये तसेच नेटफ्लिक्स वेब सीरिज सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत दिसली. 


आमच्या आनंदात भर 


'आता हे सर्व या क्षणी होतयं. आमच्या सुखी जिवनात आणखी आनंद येणार आहे. हो. आता चमत्कार होणार आहे.


या चमत्काराला आयुष्य म्हणतात. माझ्या आत नवं आयुष्य जन्म घेतंय.' असा मेसेज लिहत सुरवीनने आपला पती आणि व्यावसायिक अक्षय ठक्कर सोबत एक फोटो ही शेअर केलायं.