... त्या क्षणापासून ते काका नव्हते; घरातलं पैशाचं संकट दूर करण्यासाठी अभिनेत्रीच्या अब्रुशी तडजोड
`सेक्रेड गेम्स` या वेबसीरिजमध्ये एका अभिनेत्रीने ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर या पुस्तकात लैगिक शोषणाचा वाईट अनुभव सांगितलाय.
मुंबई : 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमध्ये कुक्कुची भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री कुब्रा सैत हीने तिच्या ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर या पुस्तकात लैगिक शोषणाचा वाईट अनुभव सांगितलाय. वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यासोबत लैगिक शोषण झाले होते. मात्र कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तब्बल अडीच वर्षे ती अत्याचार निमुटपण सहन करत होती. हे घाणेरडे कृत्य तिच्याच जवळच्या कुटूंबातील काकाने केल्याचा खुलासा तिने या पुस्तकात केलाय.
कुब्रा सैतने तिच्या 'ओपन बुक' या पुस्तकात आयुष्यातील कडवट असा वेदना सांगितल्या आहेत. कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तिने तब्बल अडीच वर्ष अत्याचार सहन केला. या घटनेच्या अनेक वर्षानंतर तिनेही घटना आईला सांगितली, तिच्या घरात, तिच्या नाकाखाली कसे अत्याचार झाले,याचा वाईट अनुभव सांगितला. पुढे तिने सांगितले या सर्व प्रकारानंतर आईने तिची माफी मांगितली होती.
कुब्रा पुढे लिहते की, जेव्हा त्या व्यक्तीने आईला पैसे दिले आणि सुटकेचा श्वास घेतला त्याचवेळी मी ही दिर्घ श्वास घेतला. मात्र एकदा कारमध्ये असताना त्यांनी माझ्या ड्रेसमध्येच हात टाकला आणि मांडी घासत हसत होता. त्या क्षणापासून ते माझे काका राहीले नव्हते. मी सुन्न झाले होते. तो सतत आमच्या घरी येऊ लागला आणि माझी आई त्याच्याबरोबर हसत आणि स्वयंपाक करायची. तिच्यासमोर तो माझ्या गालाचे चुंबन घ्यायचा आणि म्हणायचा, ‘अरे कुब्राती, तू माझी आवडती लहान आहेस’. या घटनेने मी अस्वस्थ व्हायेच, पण तरीही मी शांत राहीले.
लैंगिक शोषणाबाबत बोलताना कुब्रा म्हणते, तिचा काका तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्याने सर्वप्रथम तिच्या चेहऱ्यावर वार केले.त्यानंतर तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. या घटनेत ती फार गोंधळलेली होती, परंतु एक शब्दही बोलू शकत नव्हती. “ तिला सतत वाटत होतं, हे व्हायला नको होतं, पण ते घडत होतं. मी ओरडायला हवे होते, पण मी ते करू शकत नव्हते नाही. मदत मागायल हवी होती, मात्र तसे मी काहीच केले नसल्याचे ती म्हणतेय.
काकाचे चुंबन वाढतचं होते. त्याने मला पटवून दिले होते की त्याला जे हवे आहे ते मला चांगले वाटेल. मला बधिर झाल्यासारखे वाटेपर्यंत तो त्याची पुनरावृत्ती करत राहिला आणि मग त्याने त्याची पॅन्ट उघडली. यावेळी नक्की काय घडत होत याची मला खात्री नव्हती, पण मला आठवते की मी माझी व्हर्जिनिटी गमावत होते,असे कुब्ब्राने लिहिले.
कुब्रा पुढे लिहते की, जर तिने विरोध केला असता तर तो तिच्या आईचे फोन घेणे थांबवेल. जेव्हा त्याने कुटुंबाला मदत करण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्या काकाशी भांडण केले. कुब्राने पुढे लिहते की, तिचे लैंगिक शोषण होत होते आणि तिच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला ती सांगू शकत नव्हती. जर तिने तिच्या लैंगिक शोषणाविषयी तिच्या कुटुंबाला सांगितले तर ‘आमचा नाश होईल’ असे सांगून काकाने तिच्या कुटुंबाला धमकी दिली होती.
कुब्रा लिहते की तिने सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर तिचा विश्वास आहे आणि आज ती जर त्याच्या जागी असती तर कदाचित वेगळे काही केले नसते. त्या क्षणी ती म्हणाली, तिचे मन आणि आत्मा 'मेल्यासारखे' वाटत होते. असा भयानक आणि वेदनादायी अनुभव तिने पुस्तकात शेअर केला आहे.