`सेक्रेड गेम्स` सिरीजचे नवीन भाग प्रदर्शित होणार नाही
चाहत्यांना मोठा फटका
मुंबई : अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडलेली Netflix वरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीजला मोठा फटका बसला आहे. या सिरीजविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सिरीज आणि सिरीजमधील कलाकारांना मोठा फटका बसणार आहे. या सिरीजचे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. मात्र पुढील भागांना याचा फटका बसला आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठ भाग प्रदर्शित झाले आहे त्यावर काही करू शकत नाही मात्र या पुढील कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नयेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे आता यापुढील सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नेटीझन्ससाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. सेक्रेड गेम्स या सिरीजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केली आहे असा दावा करत काँग्रेसकडून यावर टीका केली होती. याची पुढील सुनावणा 19 जुलै रोजी होणार आहे.