मुंबई : नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीज सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिरीजमधील बोल्ड सीन आणि त्याचे संवाद प्रेक्षकांच मन जिंकत आहे. सिरीजमधील बोल्ड सीनची खूप चर्चा होतेय. या वेब सिरीजमध्ये ट्रान्सजेंडरची भूमिका कुब्रा सैतने केली आहे. एका मुलाखतीत कुब्राने तिच्या रोलबद्दल अनेक खुलासे केले. 


न्यूड सीन करण्यासाठी केलं हे काम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुब्राने सांगितलं की, अनुराग कश्यापच्या ऑडिशनमध्येच मला न्यूड सीनबद्दल सांगितलं होतं. हे सीन भरपूर सुंदरतेने साकारले जातील. हे सीन शुट झाल्यावर लक्षात आलं की याचं महत्व किती आहे. चांगल काम करण्यासाठी कोणतीही गोष्ट चुकीची नसते असं अनुरागने सांगितलं होतं. वेब सिरीजमध्ये हा सीन नवाजुद्दीन आणि कुब्रासोबत शूट केलं आहे. सीनमध्ये पारितोष यांची गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीन सिद्धिकीसोबत कुकू म्हणजे कुब्राबाबत बोलणं होतं. हा सीन वेब सिरीजमधील महत्वाचा सीन आहे. या वेबसिरिजमधल्या एका दृश्यासाठी किमान सात वेळा विवस्त्र व्हावं लागल्याचं नुकतंच तिनं एका मुलाखतीत सांगितलं.


 कुब्रा म्हणजे कुक्कू आपली तृतीयपंथीयाची ओळख लपवून ठेवते. तिचं हे खोटं नवाजुद्दीनला समजतं त्यावेळी तो तिला विवस्त्र होण्यास सांगतो. मात्र या सीनमध्ये कुब्राकडून जसा अभिनय अपेक्षित होता तसा तिनं केला नाही म्हणूनच जवळपास ७ वेळा या सीनसाठी सीटेक घेण्यात आल्याचं कुब्रानं नुकतंच एका मुलाखतीत उघड केलं. इतकंच नाही तर मद्यपान करायला सांगून मला काही डायलॉग्सही बोलायला लावले असंही ती मुलाखतीत म्हणाली. ‘हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं त्यामुळे संकोचलेपणा मला आला. मी भावूक झाले यासाठी कश्यप यांनी माझी अनेकदा माफी मागितली. पण मी हे दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा ते खरंच अप्रतिमरित्या चित्रित करण्यात आलं होतं’, असंही सांगायला ती विसरली नाही.