Happy Birthday Sagarika : झहीर खानने सागरिका घाटगेशी लग्न करण्यासाठी सासरच्या मंडळींना केलं होतं असं प्रभावित
अंगद बेदी हा माजी क्रिकेटपटू बिशन सिंग यांचा मुलगा आहे, त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून सागरिका झहीरला पहिल्यांदा भेटली. झहीरला सागरिका पहिल्या नजरेतच आवडली होती
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिचा आज वाढदिवस आहे. ती आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सागरिकाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण तिला खरी ओळख 'चक दे इंडिया' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. 2017 मध्ये सागरिकाने क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केलं. तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आहे. आज आम्ही तुम्हाला सागरिकाच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.
चक दे इंडिया या चित्रपटात प्रीती सबरवाल बनून प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळवणारी अभिनेत्री सागरिका घाटगे हिचा आज वाढदिवस आहे. यासोबतच ही अभिनेत्री आज 37 वर्षांची झाली आहे. सागरिकाने 2017 मध्ये टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानशी लग्न केलं. सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची प्रेमकहाणी अतिशय गोड आणि साधी होती. कोणत्याही प्रेमकथेप्रमाणे या प्रेमकथेतही काही समस्या होत्या, तरीही सागरिका आणि झहीर यांनी यावेळी प्रेमाला अधिक महत्त्व दिलं.
धर्माची भिंत तोडून दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते, अशा परिस्थितीत झहीर खानने सागरिकाच्या कुटुंबाची समजूत घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याबाबत झहीर खान आणि सागरिका यांनी एका मुलाखतीत एकत्र सांगितलं होतं की, झहीरने तिला पटवून दिलं होतं की तो फक्त तिच्यासाठीच बनला आहे.
'मी अशा अनेक लोकांना भेटले आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही कमावलं आहे. झहीरमधील त्याची डाउन टू अर्थ क्वालिटी मला खूप आवडली. तो लोकांसोबत कसा राहतो हे मी पाहिलं होतं. प्रत्येकाला तो आवडतो कारण तो एक चांगला माणूस आहे.
जेव्हा झहीरने सागरिकाच्या वडिलांसोबत तासभर भेट घेतली होती
झहीर खान म्हणाला होता, 'आम्ही दोघे एकमेकांच्या कुटुंबाचा खूप आदर करतो. वडिलांच्या आधी त्याच्या आईला आमच्याबद्दल माहिती होती. तिने आम्हाला खूप मदत केली. जेव्हा मी सागरिकाच्या वडिलांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटलं मला फक्त 15-20 मिनिटं भेटायला मिळेल, आणि परत यावं लागेल. मात्र ही बैठक 3 तास चालली. मात्र, त्या 3 तासात आम्ही फक्त सर्वसाधारणपणे बोललो.
तर सागरिकाने सांगितलं की, 'जेव्हा मी झहीरच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी नक्कीच खूप घाबरले होते. आम्हा दोघांनाही एकमेकांचं मत समजलं, त्यामुळे आम्ही ठरवले की सर्व काही अगदी सोप्या पद्धतीने करायचं. आम्हाला फक्त आमच्या आई-वडिलांनी आमच्या आनंदाचा भाग बनवायचं होतं, त्यांनी आमच्या निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे.
अशा स्थितीत ती असंही म्हणाले की, तुला पाहिजे तसं कर, आमच्या प्रार्थना तुझ्या पाठीशी आहेत. झहीरने सांगितलं की, सागरिका जेव्हा पहिल्यांदा आईला भेटली तेव्हा दोघांमधील एनर्जी अप्रतिम होती. त्या दिवशी सागरिका खूप खुश होती. सागरिका आणि झहीरने जवळच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणाने लग्न केले. मित्रांनी कोर्ट मॅरेज केले होते.
अशी झाली सागरिका आणि झहीर खान यांची भेट
अंगद बेदी हा माजी क्रिकेटपटू बिशन सिंग यांचा मुलगा आहे, त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून सागरिका झहीरला पहिल्यांदा भेटली. झहीरला सागरिका पहिल्या नजरेतच आवडली होती, असं म्हटलं जातं. दोघांनी एकमेकांशी मैत्री केल्यानंतर एकमेकांचा फोन नंबर घेतला.
या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झालं ते झहीर आणि सागरिकालाही कळलं नाही. विशेष म्हणजे सागरिका आणि झहीरच्या अफेअरबद्दल कोणालाच माहिती नव्हती. पण दोघांची नजर युवराज सिंग आणि हेजल कीचच्या लग्नात आली, ज्यामध्ये दोघंही एकमेकांचा हात धरून पार्टीत पोहोचले. यानंतर सागरिका आणि झहीरच्या लव्हस्टोरी समोर येऊ लागली.