मुंबई : अनुष्का शर्मा तर अ‍ॅक्टींगमध्ये एका उंच शिखरावत्र पोहोचली आहे, पण काय तुम्ही कधी विराटला अ‍ॅक्टींग करताना पाहिलंय? जर तुमचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर विराट-अनुष्काच्या रिसेप्शनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. 


विराटची अ‍ॅक्टींगबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिसेप्शनमधील या व्हिडिओमध्ये विराट पत्नी अनुष्कासोबत अ‍ॅक्टींग करताना दिसत आहेत. विराटकडून अ‍ॅक्टींग करवून घेण्याचं श्रेय दुस-या कुणाला नाहीतर बॉलिवूड किंग शाहरूख खान याला जातं. या व्हिडिओत शाहरूख खान ‘जब तक है जान’ या सिनेमातील काही रोमॅंटीक डायलॉग म्हणत आहे. त्याच्या डायलॉगवर विराट अ‍ॅक्टींग करत आहे. पण यात एक ट्विस्टही आहे. 



शाहरूखची मस्ती


मंगळवारी मुंबईत विरूष्काचं दुसरं रिसेप्शन झालं. या दरम्यान शाहरूख खान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याने म्हटलेले डायलॉग विराटने रिपिट केले. पण त्यात ‘जब तक है जान’ च्या ऎवजी ‘जब तक है खान’ असे अ‍ॅड केले. यामुळे तिथे विराट अनुष्कासोबत सर्वांमध्ये एकच हसू खिळले.