मुंबई : महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ यांनी श्रमदान केले. सईने कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावात श्रमदान केले. मागील पाच वर्षांपासून सई नियमित श्रमदानाचे कर्तव्य बजावते. सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, अभिनेता अमेय वाघ याने सोशल मीडियावर श्रमदान केल्याचा फोटो पोस्ट केला आहे. सोळशी गावात त्याने श्रमदान केले आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीले की, 'आज सोळशी गावात 'पाणी फाउंडेशन' अंतर्गत महाश्रमदान करण्याची संधी मिळाली, हे काम सोपे नाही. एकजुटीनं काम करणारे गावकरी आणि कार्यकर्ते यांना माझा सलाम...महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..जय महाराष्ट्र



अभिनेता अमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी 'पाणी फाउंडेशन' संस्थेची स्थपना केली महाराष्ट्रातील अनेक गाव या स्पर्धेत उतरले आहेत. कोणत्याही प्रकारच्या नफ्याचा विचार न करणारी ही संस्था आहे. फक्त गावाचा विकास हाच पाणी फांउडेशनचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना 'पाणी फांउडेशन' दुष्काळग्रस्तांसाठी देवदूत म्हणूण काम करत आहे. १ मे म्हाणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मराठी सेलेब्रिटींनी श्रमदान केले.