मुंबई : झी युवा वाहिनीवरच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिके मधले नचिकेत आणि सई सध्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. काही दिवसांपुर्वीच या मालिकेमध्ये नचिकेतची खास मैत्रिण कादंबरी म्हणजेच कॅडीची थेट ऑस्ट्रेलियामधून मुंबईमध्ये सरप्राईज एंट्री झाली. त्यामुळे कॅडी नचिकेत आणि सई यांचा प्रेमाचा त्रिकोण मालिकेमध्ये बनतोय की काय अशी शक्यता प्रेक्षकांना दिसू लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅडीचा घरामध्ये प्रवेश झाल्यापासूनच ती तिच्या वागण्या बोलण्याने अनेकांच्या नजरेमध्ये येताना दिसतेय. मग ते अप्पा असू देत किंवा सई किंवा इतर कोणी. कॅडी सगळयांच्याच चर्चेचा केंद्रबिंदू बनलीये. असं असतानाही ज्याच्याकडून आपली विशेष दखल घेतली जावी असे तिला वाटतेय तो नचिकेत मात्र तिच्यापासून दूरच आहे आणि सईच्या अधिक जवळ जातोय.



नचिकेत आणि सईची ही जवळीक कॅडीच्या मनात संशय निर्माण करु लागलीये. सई आणि नचिकेत यांच्या नात्याचे रहस्य नक्की आहे तर काय हा प्रश्न तिला सतावू लागलाय आणि तो सोडवण्यासाठी ती धडपडताना दिसतेय. कॅडीची ही धडपड मालिकेमध्ये काय नवं वळण आणतंय हे आता पहायचं. अर्थात त्यासाठी पहात रहा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका रोज रात्री ८ वाजता फक्त झी युवावर.