Sai Tamhankar Home : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमात दिसत आहे. तर सईचे कार्यक्रमातील लूक्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता सई चर्चेत असण्याचं कारण तिचं घर आहे. सईनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या नव्या घरा विषयी सांगितलं होतं. आता तिनं तिचं घर दाखवलं आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या नव्या घराचा व्हिडीओ तिनं शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई ताम्हणकरनं हा व्हिडीओ तिच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सईनं तिचं मुंबईतलं पहिलं घर दाखवलं आहे. अर्थात सांगलीकर सई आता मुंबईकर झाली आहे. मुंबईत 10 घरात सई भाड्यानं राहिली आहे. सईनं आता तिचं 11 वं घर हे हक्काच घेतलं आहे. सईनं या घराला ‘द इलेव्हंथ प्लेस’ असं नाव दिलं आहे. तिच्या या आलिशान घरात सगळ्या सोई-सुविधा आहेत. तिच्या या घरात मोठे दरवाजे, खिडक्या आणि लक्झरी फर्निचर आहे. तिच्या घराचा लिव्हिंग रूम हा खूप मोठा आहे. या लिव्हिंग रूममध्ये सईनं तिनं मोठी झाडं लावली आहेत. तर, सईचं एक वॉक-इन क्लॉझेट आहे. त्या वॉकइन क्लॉझेटमध्ये चप्पल आणि बुटांसाठी एक खास कपाट बनवण्यात आले आहे.  इतकंच नाही तर पारंपारिक कपड्यांसाठी वेगळं कपाट आणि वेस्टर्न कपड्यांसाठी वेगळं कपाट आहे. सईनं घरातल्या एका बेडरूमला वॉकइन क्लॉझेट बनवलं आहे. सईचं हे घर मुंबईतील मालाड परिसरात आहे.  सईच्या घराविषयी बोलायचे झाले तर त्यात पांढऱ्या रंगाचा सगळ्यात जास्त वापर करण्यात आला आहे. तिच्या घराचं इंटेरिअर पाहिलं की कोणालाही प्रसन्न वाटेल असं आहे. 


हेही वाचा : सलमान खानच्या 'या' प्रॉपर्टीचे भाडे तब्बल 1 कोटी रुपये, पण यात राहतं कोण?


सईनं या व्हिडीओत सांगितलं आहे की ती लहाण असताना आई-वडिलांसोबत जेव्हा सांगलीत रहायची तेव्हा ती उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे मुंबईत रहायला यायची. तर कधी न थांबणारी मुंबई तिला खूप आवडली आणि तिनं आईला सांगितलं होतं की मी त्या शहारत राहिनं. 



दरम्यान, सईनं तिच्या करिअरच्या सुरुवातीचे काही दिवस हे पेइंग गेस्ट म्हणून काढले. त्यानंतर ती आता जिथे राहते त्या बिल्डिंगच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. फक्त ते घर नाही तर त्यासोबत तिच्या भावना तिथल्या जवळच्या परिसराशी जोडलेल्या आहेत. तिथलं एक किराणा दुकाण हे फक्त किराणा दुकान नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. कारण कधी घरी जेवायला काही नसेल तर सई त्या दुकाणाच्या मालकाला कॉल करून विचारायची की तुम्ही जेवणात आज काय बनवलं आहे, तर मला दोन चपात्या पाढवून द्या. लॉकडाऊनमध्ये सईनं घर पाहायला सुरुवात केली आणि तिनं पाहिलेलं हे तिसरं घर होतं. तिला हे घर खूप आवडलं आणि तिनं लगेच बूक केलं. तिनं यावेळी हे देखील सांगितलं की ती कधीच डायनिंग टेबलवर बसून जेवली नव्हती. तिला एक डायनिंग टेबल हा हवाच होता. त्यामुळे तिनं इथं हक्कानं डायनिंग टेबल बनवला.