घटस्फोटानंतर पतीसहीत मित्र-मैत्रिणींसोबत Divorce Party; सई ताम्हणकरनंच केलेला खुलासा
Sai Tamhankar Divorce Party : सई ताम्हणकरचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे सईचं लग्न आणि तिच्या घटस्फोटाविषयी... सईनं घटस्फोट घेतलयानंतर तिच्या मित्रांसोबत पार्टी केली होती.
Sai Tamhankar Divorce Party : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. सईनं मीमी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. या चित्रपटासाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत. आज सई ताम्हणकरचा वाढदिवस असून ती आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करते. सईचे लाखो चाहते आहेत. तर तिच्या चाहत्यांच्या यादीत रोज लोकांची संख्या वाढत असते. सईचा बिनधास्तपणा या मागचं कारण असल्याचं म्हटलं जातं. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
सईनं तिचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही. सई तिच्या खासगी आयुष्यावर मोकळेपणानं बोलताना दिसते. सध्या सई ही अनिश जोगलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, सईचं आधी लग्न झालं असून तिचा घटस्फोटही झाला आहे. याविषयी देखील सई मोकळेपणानं बोलली आहे. सईनं सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सईनं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविषयी बोलताना सांगितलं होतं की "मी अजुनही पूर्वाश्रमीच्या पतीच्या संपर्कात आहे. मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटते. ते क्षण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते."
पुढे घटस्फोटाविषयी सई म्हणाली, "ज्या दिवशी आम्ही दोघांनीही कोर्टात जाऊन सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं आणि आमच्या घटस्फोटाबाबत सांगितलं. रात्रभर आम्ही मद्यपान केलं आणि धम्माल केली. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. त्याच्या नावाचे टॅटूही मी काढले आहेत आणि अजूनही ते टॅटू तसेच आहेत. एक वेळ अशी असते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. मग त्यानंतर त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणून आजही ते टॅटू मी तसेच राहु दिले आहेत.'
हेही वाचा : Mahesh Babu नं खरेदी केली गोल्ड रेंज रोवर... कारची किंमत ऐकूण बसेल धक्का
सईच्या खांद्यावर दोन टॅट्यू असून त्यातील एक हा तिच्या आणि पूर्वाश्रमीचा पती अमेय गोसावीनं प्रपोज केलं ती तारिख आहे. तर दुसरी तारिख ही त्यांच्या लग्नाची म्हणजेच 15 डिसेंबर 2013 आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण त्यांचा संसार हा फक्त दोन वर्ष राहिला. 2015 मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.