मुंबई : हॉट मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे मोबाईलमधले प्रायव्हेट फोटो लीक झाले आहेत. सध्या सईही शूटींगसाठी मुंबईच्या बाहेर आहे. शूटींग करत असताना तिचा फोन हरवल्याचं तिने म्हटलं आहे. पण जेव्हा मोबाईल सापडला तेव्हा लक्षात आलं की, मोबाईलमधले काही खासगी फोटो लीक झाले आहेत. सुरुवातील फोन लपवून कोणीतरी मस्करी करत असल्याचं सईला वाटलं पण नंतर यामागचं गांर्भीय लक्षात आल्याने सईने म्हटलं आहे. त्यानंतर मात्र सईचं कामातून लक्षच उडालं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसाच्या शेवटी जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा त्या मोबाईलवर दोन मोठे स्क्रॅचेस असल्याचं दिसलं. दरम्यान या सगळ्या गोष्टीसाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी सईने चाहत्यांचं आणि मीडियाचे आभार मानले आहेत.




काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासनची मुलगी अक्षरा हासनचे खाजगी फोटो सोशल मिडियावर लीक झाले होते. या प्रकरणी  मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फोटो लीक प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अब्रूनुकसान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फोटो लीक करण्यासाठी अक्षराचा मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक करण्यात आला होता का याचा पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षराचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. असे फोटो लीक झाल्याबद्दल अक्षराने दुख: व्यक्त केलं होतं. सोमवारी तिने सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षरा हसनचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.