`तुम्ही कोण ठरवणारे?`, इंग्रजीवरून ट्रोल करणाऱ्यांना सईनं उलटसुलट फटकारलं
Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा व्हिडीओ पाहता सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता सईनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Sai Tamhankar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या घरामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सईनं सोशल मीडियावर तिच्या या नव्या घराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सई ताम्हणकरनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत सईनं रॅपिड फायर राऊंडमध्ये इंग्रजीमध्ये उत्तर दिली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते.
सईसोबत कर्ली टेल्स या लोकप्रिय चॅनलनं एक रॅपिड फायर केला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सईनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. मुंबईत राहत नसती तर कुठे राहत असती? त्याशिवाय कोणासोबत आयुष्य स्विच करायला आवडेल ते सध्या कोणतं गाणं सई सतत ऐकते, असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांवर सईनं इंग्रजीत उत्तर दिली. तिनं इंग्रजीत उत्तर दिल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या या नेटकऱ्यांनी सईनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
पाहा सईचा व्हिडीओ -
सईनं दिले नेटकऱ्याला सडेतोड उत्तर
सईच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की 'इंग्रजीमध्ये काय बोली तू मला काहीच समजलं नही... माझ्या डोक्याच्या बाहेर आहे इंग्रजी...'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'मराठी भाषा बोला मॅडम.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मराठीमध्ये बोलली असतीस तर काय झालं असतं? तुला मराठीत बोलायला लाज वाटते का?' नेटकऱ्याची ही पोस्ट पाहताच सईनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. सई म्हणाली की 'हे एक इंग्रजी चॅनेल आहे. आधी तुम्ही नीट माहिती मिळवा मगच बोला. मी कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला.'
हेही वाचा : रिया चक्रवर्तीला तुरुंगात का करावा लागला नागिन डान्स? 3 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
मात्र, काही नेटकऱ्यांनी सईनं दिलेल्या उत्तरावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'कोणताही गणपती श्रीमंत आणि गरीब नसतो मॅडम.. देवा मद्ये सुद्धा तुम्ही आता गरीब श्रीमंत बघायला लागलात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'गणपती गरीब आणि श्रीमंत पण असतो, सई बाई काय झालंय तुम्हाला, तुम्ही खाताय तो मोदक गरीब आहे की श्रीमंत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पोहा नाही पोहे.. पंडाल नाही मंडळ.'