रिया चक्रवर्तीला तुरुंगात का करावा लागला नागिन डान्स? 3 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या तुरुंगातील दिवसांविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 6, 2023, 01:37 PM IST
रिया चक्रवर्तीला तुरुंगात का करावा लागला नागिन डान्स? 3 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
(Photo Credit : Social Media)

Rhea Chakraborty : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्यासाठी 2020 वर्षे हे काही चांगलं ठरलं नव्हतं. त्याच वर्षी सुशांतनं आत्महत्या केली आणि त्यासाठी तिला जबाबदार ठरवण्यात येत होतं. त्यानंतर तिचं आयुष्य कसं झालं हे रियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. सुशांतच्या निधनानंतर तिला लोकांच्या द्वेषचा कसा सामना करावा लागला हे त्याने सांगितले. रियाने जेलमधील जग कसं आहे ते सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source

रियानं ही मुलाखत 'इंडिया टुडे कॉन्क्लेव 2023' ला दिली होती. या मुलाखतीत रियानं ड्रग्स आणि आत्महत्येवर सांगितलं. तिनं म्हटलं की जे होईल ते होईल, आता सर्व काही एजन्सी ठरवेल. मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळ आल्यावर ते आपला निकाल देतील.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी बोलताना रिया पुढे तुरुंगातील तिच्या अनुभवांविषयी बोलताना दिसली. 'तो काळ खूप कठीम होता. तुरुंगात राहणं सोप नसतं. तुरुंगातील जग हे खूप वेगळं आहे. तुमच्याकडून तुमची ओळखच काढून घेतली जाते आणि तुम्हाला एक नंबर दिला जातो. त्यावेळी असं वाटू लागतं की जणू काही सगळं संपलं आहे. तुम्ही खाली-खाली जातचं असतात,' असं रिया म्हणाली.

तुरुंगातील महिलांकडून काय शिकली?

रियानं पुढे सांगितलं की 'या घाणेरड्या जगात देखील लोक आनंदी आहेत. तुरुंगात राहणाऱ्या महिलांकडून मला आनंदी राहण्याची शिकवण मिळाली. जेव्हा तुरुंगात एक समोसा वाटण्यात येतो, तेव्हा ते पाहूण त्यांना खूप आनंद होतो. एक समोसा पाहून त्यांच्या डोळ्यात असलेली एक वेगळीच चमक पाहायला मिळते. आपल्याला त्यातून शिकायला हवं. आपण जगभरातील वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळाली अशी आपल्याला इच्छा असते आणि ते लोक इतक्यातच आनंदी होतात.' 

हेही वाचा : Boyz 4 Trailer : ऐकलं का बरे! गौरव मोरेची सुधारलेली मराठी अन् खूप सारे डबल मिनिंग डायलॉग

जामिन मिळताच केला नागिन डान्स

रियानं पुढे सांगितलं की 'तिनं त्या महिलांसाठी नागिन डान्स केला होता. त्याविषयी सांगताना रिया म्हणाली की मी त्या सगळ्यांना वचन दिलं होतं की जेव्हा मला जामिन मिळेल, तेव्हा मी नागिन डान्स करेन. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा फक्त मला जामिन मिळाला होता. माझा भावा तेव्हा जामिन मिळाला नव्हता. अशात जेलरनं देखील म्हटलं होतं की राहू दे करून. पण मला असं वाटलं की जर आज मी अशीच निघून गेली तर मी त्यांच्या भावना दुखावेल. मग त्यानंतर मी त्या सगळ्यांसोबत नागिन डान्स केला. मी तो क्षण विसरू शकत नाही. सगळ्या महिला माझ्यासोबत खाली लोळून नागिन डान्स करत होत्या.' 

About the Author