Samantar Season 2 | `समांतर 2` वेबसिरीजला सई ताम्हणकर देणार नवी दिशा ?
यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
प्रेरणा कोरगांवकर, मुंबई | अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) , नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'समांतर' या वेबसिरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे सगळेच सिझन 2 ची आतुरतेने वाट पाहू लागले. आता ही प्रतीक्षा संपली असून 'समांतर 2' चा (Samantar Season 2 Trailer) ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाये.. तर 1 जुलै पासून ही वेबसिरिज (Web Series) प्रेक्षकांना एमएक्स प्लेयरवर पाहता येणार आहे. यात अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवेश होणार असून ती कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसतेय. (SAI TAMHANKAR WILL CHANGE THE GAME OF SAMANTAR 2?)
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आपण सईची झलक पाहिलेलीच आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? असे प्रश्न सध्यया प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत.
खास सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो चाहत्यांसोबत शेअर केलाये.
समांतर 1 मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. ,सीजन 2 मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे.
यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
हा वेब शो मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या :
'या' अभिनेत्रीवर आली वाईट वेळ, 'या' कारणासाठी मिळत नाहीये काम
Michael Jackson Death Anniversary: पॉपस्टारच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से