मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नापासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंतच्या बातम्या खूप चर्चेत असतात. सैफ-अमृता यांचं 1991 मध्ये लग्न झालं. सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान दोघांच्या नात्याबद्दल कायम सांगत असते. एका मुलाखतीत सारा आसाचं एक किस्सा सांगितला, जो आज देखील चर्चेत असतो. आज आम्ही तुम्हाला सैफ आणि अमृताशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत जो खूपच रंजक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराने सांगितलं, 'आई आणि बाबा जेव्हा एकत्र होते. तेव्हा दोघे त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचे. त्यावेळी दोघांनी त्यांची मैत्रिण निलू मर्चेंडसोबत एक प्रेंक करण्याचा विचार केला. त्यासाठी बाबांनी आईच्या तोंडाला बूट पॉलिश लावलं.'



'त्यानंतर त्यांनी आईला निलूच्या रुममध्ये ढकलून दिलं आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. तेव्हा रुममध्ये निलू तिच्या पतीसोबत होती. आईला अशा परिस्थितीत पाहून निलूच्या पतीने बंदूक बाहेर काढली...'


पुढे सारा म्हणते, 'त्यांच्या हातात बंदूक पाहून आई घाबरली आणि म्हणाली गोळी घालू नका मी डिंगी आहे... त्यामुळे आई वाचली...' साराला अनेक मुलाखतींमध्ये आई-वडिलांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले जातात. 


विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सारा मोकळेपणाने देते. साराबद्दल सांगायचं झालं तर ती सध्याच्या घडीला प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.