मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर 6 वर्षांपूर्वी याच दिवशी लग्नबंधनात अडकले होते. 2012 मध्ये करीनाने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि 2 मुलांच्या बापाशी लग्न केलं. आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर रिसेप्शन पार्टी देऊन हा सोहळा संपन्न झाला. या दोघांना बघून असं वाटतं की यांच प्रेम अगदी सहज मिळालं. पण तसं झालेलं नाही. करीनाला या लग्नासाठी आपल्या दोघांनाही खूप परिक्षांना सामोरे जावं लागलं आहे. करिनाने स्वतः एका मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. सैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने चक्क घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही आमच्या प्रायवसीबद्दल खूप चिंतेत होतो. एवढंच नाही तर करिनाने आपल्या कुटुंबाला धमकी दिली की, जर आमचं लग्न हे मीडियासाठी सर्कस बनलं तर मी घरातून पळून जाईन. करीनाने सांगितलं की, आमच्याबद्दल सर्व छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सगळे प्रयत्नशील असतात. आम्ही कोर्ट मॅरेज करून छतवर येऊन मीडियासोबत ही आनंदाची गोष्ट शेअर केली. लग्नाअगोदर करीना आणि सैफ लिव इनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. करीनाने लग्नाअगोदर सैफसमोर एक अट ठेवली. याबाबत स्वतः करिनाने एका मुलाखतीत सांगितलं. 


तिने सांगितलं की, मी सैफला जोडीदार यासाठी निवडलं की, मला सेल्फ डिपेंडेंट महिलेप्रमाणे रहायचं होतं. मी लग्नानंतर देखील काम करू इच्छित होती. आणि सैफने माझी ही गोष्ट मान्य केली. करीना कपूर सैफसोबत लग्न करण्या अगोदर शाहीद कपूरला डेट करत होती. 2007 मध्ये या दोघांच ब्रेकअप झालं. 'टशन' सिनेमादरम्यान सैफ आणि करीनाची ओळख झाली. या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली