Adipurush Devdatta Nage : काही दिवसांपूर्वीच ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटावर सतत ट्रोलिंग आणि वाद होत होते. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. तर प्रभू राम यांच्या मदतीसाठी सतत धावून येणारा आणि त्यांचा भक्त हनूमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे. देवदत्त नागेनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये देखील स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकंच नाही तर त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका आणि त्याच्या अभिनयासाठी त्याची स्तुती करण्यात येते. दरम्यान, आदिपुरुष या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभाससोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी देवदत्त नागेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवदत्त नागेनं ही मुलाखत लोकसत्ताला दिली आहे. या मुलाखतीत प्रभास आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारता देवदत्त नागे म्हणाला, 'आदिपुरुष या चित्रपटासाठी ओम राऊत यांनी मला विचारलं होतं. त्या वेळी मी एका क्षणाचाही विलंब न करता चित्रपटासाठी लगेच होकार दिला. सैफ अली खानबरोबर याआधी मी ‘तान्हाजी’ चित्रपटात काम केलं होतं, त्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना आपलेपणा अधिक वाटत होता. तर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्यासोबत काम करण्याती ही पहिलीच वेळ होती. तर त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा खरंच अविस्मरणीय होता. चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कुठेही प्रभास आणि सैफ अली खान यांनी आपण सुपरस्टार आहोत असा आव आणला नाही, त्यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.'



दरम्यान, देवदत्त नागे यांच्या  ‘तान्हाजी’ या चित्रपटातील कामाविषयी बोलायचे झाले तर त्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होती. या चित्रपटात देवदत्त नागेनं ओम राऊतसोबत काम केलं होतं. तर आता पुन्हा एकदा ओम राऊत यांनी देवदत्त नागेला चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आता आदिपुरुषमध्ये त्याचा अभिनय कसा असेल हे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. 


हेही वाचा : Kapil Sharma आणि भारतीच्या मुलांचा रॅम्प वॉक पाहिलात का? VIDEO व्हायरल


आदिपुरुष या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट खूप आधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आदिपुरुष चित्रपटातील कलाकारांच्या लूकवरून खूप मोठा वाद झाला होता. इतकंच काय तर त्याच्या ट्रेलरनं हा वाद आणखी वाढला होता. त्यामुळे चित्रपटाचा एक नवीन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.