मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी क्वचितच चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. पण जेव्हाही ते पडद्यावर एकत्र दिसले तेव्हा चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. आता बऱ्याच काळानंतर दोघंही पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांनी 'बंटी और बबली 2' चित्रपटात एकत्र काम केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफने किस करावं असं राणीला वाटत नव्हतं
'बंटी और बबली 2' च्या प्रमोशन दरम्यान, दोघांनी 'हम तुम' चित्रपटाचे दिवस आठवले आणि दोघंही कसे किस सीनबद्दल खूप अस्वस्थ होते हे सांगितलं. सैफ अली खानने खुलासा केला की, त्यावेळी राणी सैफला विनंती करत होती की, किसींग सीन काढून टाका असं दिग्दर्शकाला कनव्हेंन्स करायला त्याला सांगत होती. 


इच्छा नसतानाही किसिंग सीन शूट करण्यात आला
यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये संभाषणादरम्यान राणी मुखर्जीने सैफ अली खानला विचारलं, 'तुला आठवतं का की, किसिंग सीन करण्याआधी आपण किती घाबरलो होतो?' यावर सैफ अली खान म्हणाला, 'मला आठवतं की, तू त्या सीनबद्दल किती घाबरली होतीस.'



सैफने सांगितलं सगळ्यात वाईट किस
सैफ अली खानने सांगितलं की, जेव्हा राणीने त्याला या सीनसाठी दिग्दर्शकाला नकार देण्यास सांगितला तेव्हा तो म्हणाला की, मी हे करू शकत नाही, माझ्या बॉसने मला हे करण्यास सांगितलं आहे. दोघांनी हा सीन केला असला तरी सैफ अली खान म्हणाला, 'सिनेमाच्या इतिहासातील हा सगळ्यात वाईट किसिंग सीन होता. तो खूप अस्वस्थ होता. तू खूप अस्वस्थ होतीस म्हणून मी खूप अस्वस्थ झालो होतो.'