`बेकार आणि बकवास...`; सैफने चाहत्यासोबत केलेल्या कृतीने भडकले नेटकरी
Saif Ali Khan Viral Video : करीना कपूर तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. त्याआधी करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी सैफने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Saif Ali Khan Misbehave : अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या कुटुंबासोबत दिसली होती. करीना कपूरसोबत तिचा मुलांसह पती सैफ अली खान (Saif Ali Khan) दिसला होता. यावेळी सैफ अलानी खानने कुर्ता पायजमा घातलेला दिसला. करीना कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी गेले आहे. त्यावेळी संपूर्ण कुटुंब विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. आता सैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये सैफचे त्याच्या चाहत्यांसोबतचे वागणे पाहून लोक त्याला ट्रोल करत आहेत.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. व्हिडिओमध्ये सैफसोबत त्याचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. मात्र ज्यावेळी एक चाहता त्याच्या जवळ येतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो मुलगा तैमूरचा हात धरून पुढे चालताना दिसत आहे. त्यावेळी सैफने त्या चाहत्याला हाताने बाजूला हटवले आणि निघून जाण्यास सांगितले. सैफच्या सुरक्षा रक्षकाने त्या चाहत्यालाही बाजूला पाठवले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सैफच्या या कृतीवर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
सैफच्या या कृतीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असला तर त्यावर संमश्र प्रतिक्रिया येत आहेत. युजर्सनी सैफच्या या वागणुकीचे काहींनी समर्थन केले तर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने म्हटलं की, 'मुलामुळे असे केले आणखी दुसरे काही नाही.' दुसऱ्या एका यूजरने सैफला ट्रोल करत, 'जेव्हा त्याच्यात इतका अहंकार आहे, तेव्हा तू फोटो का काढायला गेला असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने भारतीय जवानांसोबत सेल्फी घ्या, भंगार आणि बकवास बॉलिवूडच्या लोकांसोबत नाही, अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, करीना कपूर लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्याआधीच करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली. सध्या करीना या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 21 सप्टेंबरला तिच्या वाढदिवसाला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष आहेत. या चित्रपटात करिनाशिवाय जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील दिसणार आहेत. याशिवाय करीना 'द क्रू' या चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात करिनासोबत तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ देखील दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे.