नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु, याआधीच साराचं 'स्टारडम' चढलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' हा सिनेमा यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. पण, सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच सैफची मुलगी आपले 'नवाबी नखरे' दाखवण्यावरून चर्चेत आलीय. पहिल्या सिनेमाच्या चर्चेनंतर साराला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, सारा आशुतोष गोवारिकर यांच्या नव्या सिनेमात अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच सारा लवकरच अनुष्का शर्मासोबत एका सिनेमात दिसणार आहे. 


पण, एवढ्यात सारानं तब्बल सात सिनेमे नाकारल्याची माहिती डेक्कन क्रोनिकलनं दिलीय. 



साराला केवळ शाहिद कपूर, ऋतिक रोशनसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची इच्छा आहे. या स्टार्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात, म्हणून तिला याच हिरोंसोबत काम करायचंय. 


सारा सिनेमांची निवड करताना अगोदर सिनेमाचं कथानकही ऐकून घ्यायची नाही तर केवळ आई अमृता सिंहच्या सांगण्यावरून सिनेमा निवडायची. 


उल्लेखनीय म्हणजे, केदारनाथ या सिनेमाच्या सेटसाठी ७ करोड रुपयांचा खर्च करण्यात आलाय. या सिनेमाचा सेट मुंबईतच उभारण्यात आलाय. यासाठी फिल्मसिटीमध्ये केदारनाथ मंदिरापासून आजुबाजुच्या अनेक ठिकाणांचा सेट उभारण्यात आलाय.