मुंबई : अभिनेता सैफ अली खान सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘कालाकांडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यान सैफने करिनाच्या काही खास गोष्टी सांगितल्या. आणि विशेष म्हणजे करिनाच्या या गोष्टी सैफला अत्यंत भावतात. 


 सैफ म्हणाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या सांगताना सैफ म्हणाला की, करिना वेळ काटेकोरपणे पाळते. त्याचबरोबर तिची काम करण्याची पद्धत, फिटनेस आणि शिस्त मला भावते. त्याचबरोबर ती अत्यंत पॅशनेट आहे. 
सैफ आणि त्याची एक्स वाईफ अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या अभिषेक कपूरच्या केदारनाथ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहे. त्यासाठी सैफ आपल्या मुलीला काही टिप्स, सल्ले सातत्याने देत असतो.


चित्रपटसृष्टीत सैफला २५ वर्ष पूर्ण


चित्रपटसृष्टीत सैफने २५ वर्ष पूर्ण केली आहेत आणि हा प्रवास अतिशय रंजक होता, असे सैफ म्हणतो. यात अनेक चढ-उतार आले. पण सातत्याने काही ना काही शिकायला मिळाले.


चित्रपटात या कलाकारांची वर्णी


‘कालाकांडी’या चित्रपटात सैफ व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, दीपक डोबरियाल, अमायरा दस्तूर, विजय राज, शोभिता धुलिपला आणि शहनाज ट्रेजरी यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय वर्मा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होईल.