मुंबई : सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांचा भूत पोलीस हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सैफ त्याच्या सहकलाकार यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससह कॉमेडियन कपिल शर्माच्या शो द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला.येत्या शनिवार-रविवारी हा शो प्रसारित केले जाईल. दरम्यान, शोशी संबंधित एक प्रोमो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये, हे पाहिलं जाऊ शकतं की, सैफ त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक गोष्टी शेअर करत आहे आणि गुपित शेअर करताना त्याला अजिबात लाज वाटत नाही. सैफ अली खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ अली खान आपल्या मनातलं बोलण्यात कधीच मागे पडत नाही. वैयक्तिक जीवनाशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर, तो आपले मत मोकळेपणाने व्यक्त करतो. आणि हेच कारण आहे की, अनेकवेळा तो ट्रोलिंगला बळी देखील पडतो. कपिल शर्माच्या शोशी संबंधित प्रोमोमध्ये असं दिसून येतं आहे की, सैफ अली खान खूप उत्साही दिसत आहे. 


या दरम्यान कपिल शर्माने सैफ अली खानला विचारलं की, त्याने लॉकडाऊन दरम्यान काय केलं? याला उत्तर देताना सैफ म्हणाला, मी पहिल्या लॉकडाऊनमध्ये फ्रेंच आणि स्वयंपाक शिकलो आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये एका मुलाचा वडिल झालो. सैफचे हे उत्तर ऐकून स्वतः कपिल शर्मालाही हसू आवरता आलं नाही. याआधीही सैफ अली खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से आणि सिक्रेट उघडपणे उघड केली आहेत. काही महिन्यांपूर्वी सैफ पत्नी करीनाच्या चॅट शोमध्ये पोहचला होता. ईथे त्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.


शो मध्ये, जेव्हा करीनाने सैफला विचारलं, लोकांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात काय करावं? यावंर सैफने उत्तर दिलं, भूमिका. हे उत्तर ऐकल्यावर करीनाही लाजली आणि ती म्हणाली, खरंच, आम्ही या शोमध्ये जवळजवळ प्रत्येक विषयावर बोललो आहोत. म्हणजे तेही ठीक आहे. सैफ पुढे म्हणाला, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करत राहिलात तर एक ताजेपणा कायम राहतो. जेणेकरून जेव्हा तुम्ही दिवसाच्या शेवटी भेटता तेव्हा काहीतरी वेगळे असतं.


सैफचा असा विश्वास आहे की, सतत त्याच गोष्टी केल्याने वैवाहिक जीवन कंटाळवाणं होतं. तो पुढे म्हणाला, मला वाटतं की, लग्नानंतर स्पार्क टिकवण्यासाठी कोणावरही दबाव येऊ नये. आपण नेहमीच आपलं आकर्षण टिकवू शकत नाही. सैफ-करीनाची पहिली भेट 'टशन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात दोघंही मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी दोघांची जोडी खऱ्या आयुष्यात हिट ठरली. सैफ-करीनाने एकमेकांना वर्षानुवर्षे डेट केले आणि नंतर 2012 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.