मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हा 4 मुलांचा वडील आहे आणि चार मुलांना वेगळा वेळ देणे इतके सोपे नाही. पण वडिलांचे हे कर्तव्य सैफ अतिशय चोखपणे पार पाडतो. दुसऱ्या लग्नानंतरही या अभिनेत्याने वडील होण्याच्या जबाबदाऱ्या कधीच टाळल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांना बऱ्याचदा सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचे बालपणीचे फोटो पाहायला आवडतात. सैफची बहीण सबा पतौडी चाहत्यांच्या या सर्व इच्छा पूर्ण करताना दिसतात. सबा तिच्या इंस्टाग्रामवर कुटुंबातील सदस्यांचे अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोंवर चाहत्यांचे भरभरून प्रेम आहे.


अलीकडेच सबाने इब्राहिमच्या बालपणीचा फोटोतिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये छोटा इब्राहिम त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.


इब्राहिम लहानपणापासूनच मस्तीखोर मुलगा आहे. आणि त्याची खोडकर शैली या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे, चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव करत आहेत. हा सुंदर फोटो शेअर करत सबाने कॅप्शनमध्ये लिहिले- बाप-मुलगा... काही नाती कायम टिकतात.


त्यामुळे असं बोललं जात की, सैफ अली खान आणि इब्राहीममध्ये खास बॉण्डिंग आहे. ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.



सबाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सैफच्या चेहऱ्यावर गुलाबी रंगाचा पेंट दिसत आहे. तर त्याचवेळी इब्राहिमही लहान केसांमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. वडील आणि मुलाची ही बॉन्डिंग पाहून चाहते खूप खूश आहेत.



सबाने याआधीही अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पतौडी कुटुंबातील काही व्यक्ती दिसत आहेत. इब्राहिमचे हे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. सबाने इब्राहिमच्या चाहत्यांना एक सुंदर भेट देऊन त्यांचा आनंद वाढवला आहे.