कोरोना लस घेतल्यानंतर सैफ अली खान ट्रोल; कारण...
एखाद्या सेलिब्रिटींनी लस घेणं ही खरोखरचं एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांचं मत परिवर्तन करण्यास मदतच होईल.
मुंबई : ऍक्टर सैफ अली खानने शुक्रवारी मुंबईच्या एका हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाची व्हॅक्सीन घेतली. हेल्थ सेंटरमधुन व्हॅक्सीन घेऊ बाहेर पडताना त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर एखाद्या सेलिब्रिटीने कोरोना व्हॅक्सीन घेणं ही एक चांगली गोष्ट आहे. कारण व्हॅक्सीन बद्दल लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहे, त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटींनी लस घेणं ही खरोखरचं एक चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे लोकांचं मत परिवर्तन करण्यास मदतच होईल.
मात्र सोशल मीडियावरती सैफ अली खान कोरोना व्हॅक्सीन घेतल्याबद्दल ट्रोल होत आहे. खरंतर आता कोरोना व्हॅक्सीनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, त्यामध्ये 60 वर्षावरील व्यक्तींना कोराना लस दिली जात आहे. मग ही लस सैफला कशी मिळाली? असे प्रश्न लोकांनी उपस्थित केले आहेत.
सैफ 60 वर्षाचा झाला का? मग त्याने ही लस कशी काय घेलती? का मग तो सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला ही स्पेशल ट्रिटमेन्ट दिली जाते? असे प्रश्न ट्रोलरसने उपस्थित केले आहे. एका ट्रोलरने सैफच्या व्हिडिओवर लिहिले की, "अच्छा ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सीन दिली जात आहे का?" तर दुसऱ्याने लिहिले की, "व्हॅक्सीन तर 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना मिळणार होती, मग काका 60 वर्षाचे झाले का?" असे खोचक प्रश्न सैफबद्दल सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
सैफ बरोबरच कमल हसन, सतीश शाह यांसारख्या जेष्ठ नागरीक असलेल्या सेलिब्रिटींनी कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे. शिवाय त्यांनी नागरीकांना आवाहन केले, की व्हॅक्सीन घेण ही आपली जबाबदारी आहे आणि सुजान नागरीक म्हणून आपण लस घेललीच पाहिजे.