लग्नाआधी सैफ - करीनाचा लिव्ह-इनमध्ये राहाण्याचा निर्णय; काय म्हणाल्या बबिता
अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहे.
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहे.आता प्रत्येकाला कपल गोल्स देत असलेल्या या जोडप्याला सुरूवातीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. आता करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. दोघेही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देत असतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे, की लग्ना पूर्वी करीना आणि सैफ लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते.
महत्त्वाचं म्हणजे त्यांना लिव्ह-इनमध्ये राहाण्याची परवानगी खुद्द करीनाच्या आईने दिली. एका मुलाखतीत करीनाने सांगितलं की, 'सैफ मला म्हणाला मी २५ वर्षांचा मुलगा नाही. जो तुला रोज घरी सोडायला घरी येईल. म्हणून मला तुझ्या आई बबिताशी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बोलायचं आहे. '
पुढे करिना म्हणाली, 'सैफ असं देखील म्हणाला मला करीनासोबत राहायचं आहे. माझ्या आईने देखील आम्हाला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहाण्याची परवानगी दिली.' धक्कादायक म्हणजे करीना आणि सैफने पळून लग्न करण्याचा निर्णय देखली घेतला. पण तशी वेळ आली नाही.
'पळून लग्न करण्यासाठी सैफने प्लान देखील तयार तयार केला. पण तशी वेळ आली नाही. सर्वांच्या इच्छेनुसार आमचं लग्न झालं.' असा खुलासा करीनाने एका मुलाखती दरम्यान केला. 16 ऑक्टोबर 2012सली करीना आणि सैफने लग्न केलं. अत्यंत साध्या पद्धतीत हे लग्न पार पडलं.
सांगायचं झालं तर, करीना आणि सैफच्या लग्नात अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम खान देखील उपस्थित होते. साराने सांगितले की तिची आई अमृता सिंगने तिला या लग्नासाठी तयार केले होते. इतकेच नव्हे तर साराने सांगितले की ती करीना कपूरची एक मोठी फॅन आहे.