मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर आता सायरा बानो यांनी त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, फैजल फारुकी हे दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट मॅनेजर होते, पण आता त्यांनी ट्विट करून चाहत्यांना कळवले आहे की, कुटुंबाने दिलीप कुमार यांचे अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप कुमार यांचे प्रवक्ते फैसल फारुकी यांचं ट्विट 
याबाबत ट्विटद्वारे माहिती देताना दिलीप कुमार यांचे प्रवक्ते फैसल फारुकी म्हणाले की, 'चर्चा आणि विचारविनिमयानंतर आणि सायरा बानो यांच्या संमतीने मी दिलीप कुमार यांचे हे ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या निरंतर प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद केल्याच्या घोषणेनंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण करून देत कुटुंबीयांच्या या निर्णयाचा आदर केला.



पतीच्या निधनानंतर मोठ्या धक्क्यात सायरा बानो
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन 7 जुलै रोजी झालं. वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हिंदुजा रूग्णालयात दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. हिंदुजा रूग्णालयातच त्यांना याआधी दाखल करण्यात आलं होतं.


दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो देखील रूग्णालयात होत्या. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे सायरा बानो यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास अडथळे येत असल्यामुळे त्यांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.