Maharashtra HSC Result 2019 : महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक वर्गाचा (१२ वीचा) निकाल जाहीर झाला आहे. सैराटफेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील १२ वी पास झाली आहे. रिंकूने कला शाखेतून पास झाली आहे. तिने तब्बल ८२ टक्के गुण मिळवले आहेत. आर्चीचा सैराट सिनेमामध्ये 'इग्रंजीत सांगू का' हा डायलॉग चांगलाच गाजला. इंग्रजीमध्ये सांगु का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये इतर विषयांच्या तुलनेत कमी मार्क मिळाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकुला इंग्रजीमध्ये १०० पैकी एकूण ५४ मार्क मिळवता आले आहेत. रिंकूने सर्वाधिक मार्क भुगोल विषयात मिळवले आहेत. तिला भुगोलमध्ये सर्वाधिक ९८ मार्क मिळाले आहेत. तर सर्वात कमी मार्क हे पर्यावरण विषयात मिळाले आहेत. तिला पर्यावरण विषयात ४९ मार्क मिळाले आहे. तर मराठीत ८६ मार्क मिळाले.



रिंकूची लोकप्रियता पाहता तिला पाहण्यासाठी परिक्षाकेंद्रावर तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. हेच चित्र १० वीच्या वेळा देखील पाहायला मिळाले होते. तिच्या लोकप्रियतेमुळे तिला आणि इतरांना त्रास होऊ नये यासाठी तिने दहावीला बाहेरुनच परिक्षा दिली होती. 


दरम्यान आपल्याला भविष्यात डॉक्टर व्हायला आवडेल अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.    


यंदाचा निकाल हा ९०.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यात कोकणातला निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.२३ इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूरचा ८२.५१ टक्के इतका लागला. तसंच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात २.५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. 


यंदा महाराष्ट्राच्या एकूण ९ विभागातून  १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती.