दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर सलमान चालवणार ई-सायकल
सरकारच्या ई-सायकलींग अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता सलमान खान पुढे सरसावला आहे.
नवी दिल्ली : सरकारच्या ई-सायकलींग अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता सलमान खान पुढे सरसावला आहे.
त्यामूळे दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर स्वस्थ जीवन शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी तो सायकलिंग ट्रॅकवर उतरणार आहे.तो या अभियांनाचा ब्रांड अम्बॅसिटरही आहे.
पर्यावरणस्नेही ई-सायकल
परिवहनातील पर्यावरणस्नेही वाहन असलेल्या सायकलला सरकार प्रोत्साहन देऊ इच्छिते, छोट्या कारपेक्षा 'ई-सायकल' साधारण सायकलच्या तुलनेत मोठे अंतर कापण्यास सुविधाजनक असल्याचे, परिवनहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
इंधनाला पर्याय
सलमानची 'बिईंग ह्यूमन' ही संस्थादेखील 'ई-सायकलिंग' निर्मात्यांसोबत करार करण्याच्या तयारीत आहे. ईंधनाला पर्याय म्हणून ई वाहन आणणे माझे हे गडकरींचे स्वप्न आहे.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी यासंबंधी मत मांडले तेव्हा त्यांना 'सनकी' ठरवले गेले असे त्यांनी सांगितले.