करण - अर्जूनची जोडी पुन्हा रूपेरी पडदा गाजवणार
तब्बल २५ वर्षांनतर शाहरुख आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
मुंबई : अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल २५ वर्षांनतर शाहरुख आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. करण-अर्जून, हम तुम्हारे है सनम चित्रपटानंतर दोन्ही कलाकारांना एकत्र आणण्यासाठी अनेकवेळा निर्माते, दिग्दर्शकाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न फेल झाले. अखेर त्यांना एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुहूच्या सोहो हाऊसमध्ये चित्रपटाची स्क्रीप्ट आणि संपूर्ण टीम ठरवण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही खान चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहेत. याआधी संजय लीला भन्साळींनी 'देवदास' चित्रपटात शाहरुख खान सोबत तर 'हम दिल दे चुके सनम'सारख्या सुपरहिट चित्रपटात सलमान खान सोबत काम केलं आहे.
आता तब्बल २५ वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र येत आहेत आणि त्यांना संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन लाभणार आहेत. त्यामुळे फॅन्ससाठी ही नवीन ट्रीट असणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे संजय आणि सलमानला एकत्र आणण्यासाठी शाहरूखने घाम गाळला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला 'इंशाअल्लाह' चित्रपटाचा वाद विकोपाला आला आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तनुसार हे त्रिकूट लवकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाचा नारळ फोडणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तर, सलमान खानने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, संजय लीला भन्साळी माझे खूप चांगले मित्र आहेत. इंशाअल्लाहचा अर्थ देवाची मर्जी. मला वाटतं, हीच देवाची मर्जी आहे. पण आता या चित्रपटाला देवाने परवानगी दिली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.