मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९८ साली काळवीट शिकार केल्याप्रकरणी सलमान खानला जोधपूरच्या ग्रामीण न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलंय. राजस्थानात केलेल्या काळवीट शिकार प्रकरणामध्ये न्यायालयाचा निकाल आला आहे. आता यात सलमानला किती शिक्षा होते की कमी शिक्षा होऊन तो जामीनावर बाहेर येतो, याकडे लक्ष आहे. मात्र यानिमित्तानं सलमान पुन्हा एकदा वादासाठी चर्चेत आलाय.


वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती.यावेळी त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.


काळवीट शिकार खटला निकालाच्यावेळी सलमानला दोषी ठरविण्यात आले. मात्र, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेय. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल  करण्यात आलाय. त्यामुळे त्याला किमान सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.