‘अँग्री यंग मेन’ डॉक्युमेंट्री सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खान देखील उपस्थित होता. या कार्यक्रमात जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर आणि मुलगी झोया अख्तर देखील होते. या ट्रेलर  रिलीजच्या वेळी सलमान खानने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी सलमान खानने मनोज कुमार यांच्याबद्दल धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवार, शोले, जंजीर आणि मिस्टर इंडिया असे अनेक चित्रपट देणाऱ्या सलीम खान आणि जावेद अख्तर या लेखक जोडीने चाहत्यांसाठी एक मोठी भेट दिली. Amazon Prime 'एंग्री यंग मैन' नावाचा सलीम खान आणि जावेद अख्तर यांचा प्रवास दाखवणारी डॉक्युमेंट्री घेऊन येत आहेत. या डॉक्युमेंट्री सीरिजचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आहे. 


काय म्हणाला सलमान खान?


सलमान खानने पत्रकारांशी संवाद साधत असताना मनोज कुमार यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सलमानच्या खुलाशाचा जावेद अख्तर यांनी देखील समाचार घेतला आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या चित्रपटांबद्दल बोलताना फरहान अख्तरने सांगितले की, या दोघांनी लिहिलेला 'क्रांती' हा चित्रपट त्याने 300 पेक्षा अधिक वेळा पाहिला आहे. या चित्रपटाबद्दल सलमान खानला विचारले असता तो म्हणाला, मला फक्त मनोज कुमार यांची मुलाखत घ्यायची आहे. या चित्रपटाचे श्रेय ते सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याकडून घेत आहेत. त्यांनी हा चित्रपट लिहिला असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, सलमानबद्दल बोलताना फरहान अख्तर म्हणाला, त्यांनी हे केले? त्यामुळे मनोज कुमार यांच्यावर एक वेगळा माहितीपट बनवावा लागेल. सलमान खानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मला वाटते की त्यांनी ही कबुली देऊन खूप प्रामाणिकपणा दाखवला आहे. 


शेवटचा चित्रपट एकत्र लिहावा


सलमान खान यावर म्हणाला की, ही वस्तुस्थिती आहे. मनोज कुमार म्हणतात की मी लिहित होतो आणि त्याला सलीम जावेद वाचून दाखवत असे. पण कथा लिहिणारा तो आहे. 


सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने 1982 मध्ये वेगळे होण्यापूर्वी 24 चित्रपट एकत्र केले होते. याआधी कोणत्याही लेखकाला असे यश मिळाले नव्हते. यावेळी जावेद अख्तरने जाहीर केले की तो सलीम खानसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. ते म्हणाले की पुन्हा लिहिणार आहोत. मी सलीम खान यांच्याशी बोललो की एक शेवटचा चित्रपट एकत्र लिहावा.