Salman Khan and Arijit Singh : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'टायगर 3' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना कैफला स्क्रिन शेअर करत टायगर आणि झोयाच्या भूमिकेत पाहायचं आहे. त्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. मात्र, या सगळ्यात चर्चा ही या गोष्टीची आहे ती म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग. सलमान आणि अरिजीतमध्ये 9 वर्षे जुन्या वादाविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. अशात आता अरिजीत सिंगला सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पाहण्यात आलं आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 


अरिजीतचा व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानच्या एका एक्स अकाऊंट म्हणजे पूर्वीच्या ट्विटर फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका गाडीतून काही लोक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर येताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या फॅननं लिहिलं की 'अरिजीत सिंग सलमान खानच्या घराच्या बाहेर आज काय होतय? त्यानं केलेल्या या पोस्टवरून अशी चर्चा सुरु झाली आहे की त्या दोघांमधील वाद संपला आहे. तर ते दोघं लवकरच एकत्र काम करणार असल्याचे देखील म्हटले जाते. 



चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत की ते दोघं 'टायगर 3' या चित्रपटाच्या गाण्यांसाठी किंवा त्याचा अनटाइटल्ड विष्णुवर्धन आणि करण जोहरच्या चित्रपटाच्या गाण्यासाठी तर नाही अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. 


हेही वाचा : AR Rahman नं कोणावर ठोकला 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा? वाचा सविस्तर प्रकरण


काय होता सलमान आणि अरिजीतमधील वाद?


या व्हिडीओसोबत अनेक नेटकऱ्यांनी सलमान आणि अरिजीतमध्ये झालेला वाद आठवला आहे. 2014 मध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद अवॉर्ड फंक्शन दरम्यान, झाला होता. सलमान या शोचे सुत्रसंचालन करत होता. सलमाननं अवॉर्डसाठी अरिजीतचं नाव घेतं घोषणा केली की तू विनर आहेस. त्यावर कॅज्युअल ड्रेसमध्ये असलेला अरिजीत म्हणाला की तुम्ही लोकांना झोपवलं. त्यानंतर सलमान खाननं त्याच्या फिल्मों 'बजरंदी भाईजान', 'किक' आणि 'सुल्तान' चित्रपटातील सगळी गाणी कोणा दुसऱ्याला दिली होती. 


अरिजीतनं मागितली होती माफी!


दरम्यान, 2016 मध्ये अरिजीतनं सलमानची सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. अरिजीतनं माफी मागत 'सुल्तान' मधील गाणी त्याच्या गाऊ देण्यासाठी विनंती देखील केली होती. अरिजीतनं म्हटलं होतं की सलमानची मेसज आणि ईमेल करत अनेकदा माफी मागण्याचा प्रयत्न केला होता.