मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हर्षाली मल्होत्रा  (Haarshali malhotra) सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. काहीदिवसांपूर्वी अभिनयासोबतच तिच्यातील आणखी कला जगासमोर आली आहे. हर्षाली एक उत्तम डान्सर देखील आहे. हर्षाली अर्थात मुन्नीने अभिनेत्री करिना कपूर खानच्या गाण्यात ताल धरला होता. पण आता पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 



आता पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुन्नीने सर्वांना मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. मुन्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ज्याप्रामाणे तिने प्रत्येकाला मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे, त्यामुळे तिचं कौतुक होत आहे. हर्षालीच्या चाहत्यांना देखील तिचा हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. 


व्हिडिओमध्ये हर्षाली फार सुंदर दिसत आहे. हर्षाली कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. लहान असली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हर्षाली कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.