मुंबई : सलमान खानला लहान मुलं खूपच आवडतात. अनेक मुलांसोबत तो वेळ देखील घालवतो. सलमानच्या आईला देखील वाटतं की मुलांवरील प्रेमामुळे तो लवकरच वडील बनू शकतो. सलमान देखील अनेकदा बोलतो की तो अविवाहीत राहूनच वडील बनेल. सलमानचे अनेक मित्र देखील त्याला वडील बनतांना पाहू इच्छित आहेत. यासाठी ते त्याला बोलत देखील असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान ख़ानच्या दस का दम या शोमध्ये शाहरुख़ ख़ान सोबत त्यांची जुनी सहकारी अभिनेत्री राणी मुखर्जी आली होती. या दरम्यान राणी मुखर्जीने सलमानला लग्न न करताच वडील बनण्यासाठी आग्रह करत होती. शोच्या फायनलमध्ये राणी आणि सलमानमध्ये यबाबत ही चर्चा झाली.


बॉलिवूडमध्ये अनेक असेल कलाकार आहेत ज्यांनी लग्न न करता वडील बनण्याची इच्छा पूर्ण केली आहे. दिग्दर्शक करण जौहरने सरोगसीच्या माध्यमातून वडील बनण्याची इच्छा पूर्ण केली.



अभिनेता जितेंद्र यांच्या मुलगा तुषार कपूर देखील आयवीएफच्या माध्यमातून एका मुलाचा वडील बनला आहे. त्यामुळे आता सलमान देखील बाप बनण्यासाठी याचा विचार करतो का हे येणाऱ्या काळातच कळेल.