मुंबई : बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खान एका फिल्मी घराण्यातील आहे. सलमानच्या स्टारडमची संपूर्ण जगाला कल्पना आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये 'भाईजान'ने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमानचे दोन भाऊ सोहेल आणि अरबाज हे दोघेही बॉलिवूडशी संबंधित आहेत. सलमानचे वडील सलीम खान हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध पटकथा लेखक आहेत, तर त्यांची सावत्र आई हेलन देखील पूर्वीच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सलमानचा भाऊ अरबाज खानचे वैवाहिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते पण सोहेल खानचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीझोतात जास्त आलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सलमान खानची माजी मेहुणी मलायका अरोरा खूप चर्चेत असते पण तिची दुसरी वहिनी ही प्रसिद्धीच्या झोतापासून फार दूर राहते. आज आम्‍ही तुम्‍हाला सोहेल खानच्‍या पत्‍नी सीमा खानची ओळख करून देणार आहोत, जिचे सौंदर्या अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. सीमा खान बॉलिवूडपासून दूर असली तरी लोक तिला ओळखतात.


सलमान खानची धाकटी वहिनी सीमा खान ही एक व्यावसायिक महिला आहे आणि तिने तिच्या व्यवसायातून खूप नाव कमावले आहे.



सीमा खान एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. याशिवाय सीमाचे 'बांद्रा 190' नावाचे बुटीक आहे. त्याचबरोबर ती 'कलिस्टा' नावाचा ब्युटी स्पा आणि सलूनही चालवते.


सोहेलची पत्नी सीमा हिच्या सौंदर्याची अनेकदा चर्चा होते. सीमा खान ही सलमानची Ex-Bhabhi मलायका अरोराला देखील तिच्या शैलीने टक्कर देते.


सोहेल आणि सीमा 1998 साली लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. या जोडप्याला दोन मुलगे आहेत. एकाचे नाव निर्वाण खान तर एकाचे नाव अस्लम खान. सोहेलने आधी आर्य समाज मंदिरात हिंदू विधीनुसार सात फेरे घेऊन लग्न केले होते, नंतर मुस्लिम धर्मानुसार लग्न केले होते.