Salman Khan : सलमान खानला `या` आजाराने गाठलं
Salman Khan Dengue : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे.
Salman Khan Cancels Shooting : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आठवडे सलमान खान बिग बॉस 16 (bigg boss 16) च्या घरात येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानला डेंग्यू झाला आहे. भाईजानला डेंग्यू (Dengue) झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सलमान खान लवकर लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
सल्लूमियाला आरामाची गरज
सलमान खान येत्या काही आठवड्यांत शोमध्ये दिसणार नाही. 'बॉलिवूड हंगामा'मध्ये नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तो त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचे शूटिंगही करत होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहणार आहे. (Salman Khan big news and Salman Khan Suffering From Dengue nmp )
शो होस्ट कोण करणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानच्या अनुपस्थितीत आता हा शो करण जोहर होस्ट करणार आहे. शो होस्ट करण्यासाठी करण जोहरला (Karan Johar) मोठी रक्कम देण्यात आली आहे.