Salman Khan Relationship : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज 59 वा वाढदिवस आहे. सलमान खान गेल्या 3 दशकांपासून सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. सलमान त्याच्या कामासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहतो. त्यापेक्षा सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे त्याच्या लव्ह लाइफची. एकदा तर सलमान खान हा ज्या मुलीला डेट करत होता, त्याच मुलीलाएक पत्रकार देखील डेट करत होता. त्याविषयी त्या दोघांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. हा पत्रकार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला आज त्याविषयी जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिस्ट्री चॅनलच्या एका कार्यक्रमात सलमान खान आणि तो पत्रकार असे दोघे पोहोचले होते. त्यावेळी मीडियाशी चर्चा करताना त्या पत्रकारानं हा खुलासा केला. या पत्रकाराचं नाव राजदीप सरदेसाई आहे. राजदीप सरदेसाई आणि सलमान खान हे चांगले मित्र आहेत. त्यावेळी राजदीप यांनी त्यांचा आणि सलमान खानचा एक किस्सा सांगितला होता. त्यात राजदीप म्हणाले होते की  'सलमान खान आणि मी कधीकाळी अर्थात 27 वर्षांपूर्वी डबल डेट केलं होतं.' त्यावर सलमान म्हणाला, 'त्याच्या हे लक्षात आहे आणि माझ्या लक्षात नाही.' त्यावर राजदीप म्हणाले, 'सलमान खानच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या गोष्टी सुरु होत्या. तो आपल्या सगळ्यांसारखा सर्वसामान्य नाही. त्यामुळे त्याला कोणत्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही.  तो 1985 विषयी एका झटक्यात विसरू शकतो.' 


हेही वाचा : 2025 मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा


राजदीप यांच्या या वक्तव्यानंतर सलमान मस्करीत बोलतो, 'मी कोणासोबत? राजदीप त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात तरी सलमान सतत विचारत राहतो. तुला आठवण आहे मला नाही... मला आठवण नाही यावरून लोकं मला बोलतील. ते तेव्हा घडलं ना. त्याच्यावर आता का प्रतिक्रिया द्यायची. 1985 ची ही गोष्ट आहेना. ही खूप जुनी गोष्ट आहे. तू सांगू शकतोस, जर त्या मुलीचं लग्न झालं नसेल तर, किंवा ती तुझी पत्नी आहे का? नाही तर तिचं लग्न झालं असेल आणि तू अजूनही तिच्या संपर्कात असशील. त्यामुळे देखील तो सांगत नसेल. तू कोणाचंही नाव घेऊन शकतो. कारण मला कोणी आठवत नाही, मग त्यानं काय फरक पडतोय.'