काळवीट शिकारप्रकरण : सलमानचा निर्णय ५ एप्रिलला
काळवीटप्रकरणी २८ मार्चला सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्री यांच्या कोर्टात सुनावणी झाली. पण ५ एप्रिलला यावरील निश्चितरुपातील निर्णय समोर येणार आहे.
मुंबई : काळवीट शिकारीप्रकरणी सलमान खानवरील निर्णय ५ एप्रिल रोजी सुनावण्यात येणार आहे २८ मार्चला सीजेएम देवकुमार खत्री यांच्या कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली पण ५ एप्रिल रोजी होणाऱ्या निर्णयात सलमानला शिक्षा होणार की नाही यावर शिक्कामोर्तब होणार आहे. काळवीटप्रकरणी २८ मार्चला सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्री यांच्या कोर्टात सुनावणी झाली. पण ५ एप्रिलला यावरील निश्चितरुपातील निर्णय समोर येणार आहे. सलमान खान दोषी आढळल्यास त्याला कमीत कमी ६ वर्षआची शिक्षा होऊ शकते. ४ जानेवारीला सलमान कोर्टात हजर होता. सुनावणीदरम्यान तो ३५ मिनिटं कोर्टात उपस्थित राहिला.
काळवीट शिकार
पुराव्यांच्या अभावी जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला १८ वर्ष जुन्या 'काळवीट शिकार प्रकरणा'त सलमान खानला दोषमुक्त केलं होतं. त्यानंतर राजस्थान सरकारने सलमान खान विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. राजस्थान सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानाला सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं आहे.
१९९८ साली सलमान खाननं एका चिकांरा जातीच्या हरणाची आणि दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये खटला दाखल करण्यात आला. तेव्हापासून सलमान खानवर एकूण चार खटले सुरू होते. या खटल्यात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ३ अंतर्गत २५ आणि २७ व्या तरतूदीनुसार जंगलात मुदत संपलेला परवान्याच्या आधारे शस्त्र बाळगल्याचा सलमानवर आरोप आहे.