मुंबई : सुपरस्टार सलमान खान हा त्याच्या आगामी सिनेमासाठी ‘बिंगइनटच’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन कलाकारांचा शोध घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानने मंगळवारी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यानेच ही माहिती दिली. या अ‍ॅपमध्ये एक स्पेशल ऑडिशन सेक्शन असल्याचं त्याने सांगितलं.


सलमान म्हणाला की, ‘कुणी डान्सर असेल, कुणी अभिनय करत असेल, जर तुमच्यात प्रतिभा असेल तर या अ‍ॅपवर एक प्रोफाईल आणि व्हिडिओ लिंक पाठवून तुमची प्रतिभा समोर आणा’. हे व्हिडिओ दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्याकडून शॉर्टलिस्ट केले जातील, असे सलमान म्हणाला. इतकेच नाही तर जी नावं शॉर्टलिस्ट होतील, त्यांना मी थेट सेटवर भेटणार, असेही तो म्हणाला. 






सलमान खानने त्याच्या ट्विटमध्ये या अ‍ॅपची लिंकही शेअर केली आहे आणि हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. जर तुमच्यात त्याला हवे असलेले टॅलेंट असेल तर या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता.