रोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?
Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, `यारों का यार` म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?
Salman Khan Movies : अभिनेता सलमान खान यानं त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस चित्रपट साकारले. प्रेक्षकांनीसुद्धा त्याच्या चित्रपटांना उचलून धरलं. असा हा सलमान खान अनेकांचा आवडता अभिनेता. सिनेजगतात सुरुवातीच्या दिवसात सलमानच्या वाट्याला आलेले चित्रपट त्याच्या किरकिर्दीला खऱ्या अर्थानं कलाटणी देऊन गेले होते. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'मैंने प्यार किया'.
सलमान खान आणि भाग्यश्री यांनी या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानसोबत अनपेक्षित घटना घडली, जिथं तो स्वत:च्या भावना रोखू शकला नाही आणि नकळत सर्वांसमक्ष त्याच्या डोळ्यातून आसवं घरंगळली.
सलमाननंच सांगितला 'तो' किस्सा...
'मी त्यावेळी जवळपास 18 वर्षांचा होतो आणि कबुतर जा जा, या गाण्याच्या चित्रीकरणावेळी माध्यासमोर एक असा प्रसंग उभा राहिला, जिथं ही भूमिका माझ्याचसाठी साकारण्यात आली आहे असं मला वाटलं', असं सलमान म्हणाला.
चित्रपटाची कथा ऐकताना आपण त्या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ किंवा अनिल कपूर यांचे चेहरे समोर आणल्याचं सांगत इतकी मोठी भूमिका कधी आपल्याला मिळू शकेल याचा विचारही आपण केला नव्हता, असं सलमान म्हणाला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, ज्यावेळी च्या दृश्यासाठी कॅमेरा सज्ज झाला, आणि अॅक्शन म्हटलं गेलं तेव्हाच, आपण ही भूमिका साकारू शकतो, हा विश्वास सलमानचं मनोधैर्य वाढवून गेला आणि नकळत सर्वांसमक्ष, भर सेटवर त्याचे डोळे पाणावले.
हेसुद्धा वाचा : Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...
सूरज बरडजात्या यांच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटानं 1989 हे वर्ष गाजवलं होतं. सलमाननं या चित्रपटासाठी अनेकदा ऑडिशन दिल्या होत्या. कारकिर्दीतील या चित्रपटानं सलमानला प्रसिद्धीसोबतच इतरही बऱ्याच गोष्टी दिल्या, त्यामुळं मुलाखतींमधूनही सलमानकडून या चित्रपटाचा अनेकदा उल्लेख झाल्याचं पाहायला मिळतं.
सलमानच्या आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर, येत्या काळात तो 'सिकंदर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2025 मध्ये ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चाहत्यांना भाईजानकडून मिळणारी हीच ईदी असेल.