मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मध्य प्रदेशातील मांडू येथील ऐतिहासिक जल महलात सेट उभारण्यात आला होता, पुरातत्व विभागाकडून चित्रपटाच्या टीमला सेट काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. एएसआयच्या आदेशानंतर टीमने सेट काढले आहे. बुधवारी चित्रपटाची शुटिंग मुंज तलावात करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रॉडक्शन हाऊसला याआधी सुद्धा सावध करण्यात आले होते. परंतू चित्रपटाच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या टीमने महलात सेट तयार केला होता, टीमने प्राचीन स्मारक, पुरातन स्थळ आणि अवशेष कायदा १९५९ च्या नियमांचे उल्लंघन केले होते. 


दरम्यान, नर्मदा नदीच्या घाटावर 'दबंग 3' चित्रपटाच्या शुटिंगचा नारळ फोडण्यात आला होता. 'दबंग-3' चित्रपटाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. चित्रपटात अभिनेता बॉबी देओल सलमानच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहेत.  'दबंग-3' चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


याशिवाय सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भारत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भारत' चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ सलमानसह दिसणार आहे. त्यानंतर तब्बल २० वर्षांनंतर सलमान दिग्दर्शक संजय लीला भन्सांळींसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट सलमानसह झळकणार आहे. 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या माध्यमातून दोघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.