Salman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
Salman Khan Death Threat : सलमान खानला मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी सलमानच्या जवळच्या मित्रानं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेल करत ठार मारण्याची धमकी दिली होती.
Salman Khan Death Threat Mail Person Arrested : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) ला काही दिवसांपूर्वी ईमेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली होती. या मेलमध्ये सलमानला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या मेल प्रकरणात जोधपुर आणि मुंबई पोलीस यांनी एक जॉइन्ट ऑपरेशन केलं होतं. त्या प्रकरणात आता त्यांनी राजस्थानमध्ये एका व्यक्तीला अटक केली आहे. या मेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईचं नाव होतं. राम बिश्नोईनं सलमानला हा मेल केला होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनं याच व्यक्तीनं सलमानला धमकी देणारा मेल केला होता.
सलमानला धमकी देणाऱ्या राम बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. सलमान खानला मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या मेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईचं नाव होतं. हा मेल पाठवणाऱ्या राम बिश्नोईला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सलमानचा पीए जॉर्डी पटेलला हा मेल आला होता. त्यानंतर सलमानचा जवळचा मित्र प्रशांत गुंजाळकरने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जोधपूर पोलीस आणि बांद्रा पोलिसांनी या वेळी संयुक्त कारवाई करत गुंड राम बिश्नोईला अटक केली आहे. राम बिश्नोईला आज मुंबईत आणलं जाईल. विशेष म्हणजे राम बिश्नोईनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनाही ईमेल पाठवून ठार मारण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा : स्वत:ला संपवण्याआधी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये Akanksha Dubey सतत रडत होती, व्हिडीओ तुफान व्हायरल
जोधपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पंजाबच्या मानसा येथे 24 मार्च रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाच्या वडिलांना असाच धमकीचा मेल राम बिश्नोईनं केला होता. त्याला अटक करण्यासाठी पंजाब पोलिसांचे एक पथकही रविवारी जोधपूरला पोहोचले होते.
सलमानला आलेल्या मेलमध्ये काय म्हटले आहे?
काही दिवसांपूर्वी बिश्नोईची तुरुंगातील एक मुलाखत व्हायरल झाली होती. त्या मुलाखतीवरून सलमानला हा मेल करण्यात आला आहे. तर मेलमध्ये राम बिश्नोईनं म्हटलं होतं की गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. (बिश्नोई) इंटरव्ह्यू देख लिया होगा उसने. अगर नाही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे